Kokan: वेंगुर्ल्यात पथनाट्यातून मतदान जनजागृती

0
85
वेंगुर्ल्यात पथनाट्यातून मतदान जनजागृती

वेंगुर्ला प्रतिनिधी- मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा नागरीकांचा मुलभूत अधिकार आणि जबाबदारी आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देण्यासाठी एक शक्तिशाली साधन प्रदान करते या नागरी कर्तव्याची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी  वेंगुर्ला नगरपरिषद व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरात मार्केट परिसर व दाभोली नाका येथे २८ फेब्रुवारी रोजी मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिधुरत्न-योजनेचा-महिलां/

यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नगरपरिषदेच्या प्रशासकिय अधिकारी संगीता कुबल तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पथनाट्याद्वारे नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया, नागरिक मतदान हक्क, मतदान केल्याने समाजातील सकारात्मक बदल आणि परिवर्तन, मतदानाची गरज तसेच मशिन व याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

फोटोओळी – कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोसच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती पथनाट्य सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here