वेंगुर्ला प्रतिनिधी — वेंगुर्ला तालुका गौड सारस्वत समाजातर्फे 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात सर्व जातीतील लोकांसाठी विवाहित दांपत्यांसाठी युनिक कपल 2023 या खुल्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रदिप-प्रभू-यांना-सामाज/
या स्पर्धेत विवाहितच दांपत्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात वयाचे बंधन नाही. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यात रोख 15 हजार व मुकुट, द्वितीय क्रमांकास रोख 11 हजार व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकास 8 हजार व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके तसेच कॅटवॉक, बेस्ट कोऑर्डीनेशन व बेस्ट आऊटफिट यांना रोख रक्कमेची बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी सुजाता पडवळ (9421268239) यांच्याकडे करावी.


