Kokan: शिक्षण मंत्री दीपक केसरकर लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक -माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले

0
35
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले
शिक्षण मंत्री दीपक केसरकर लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक

शिक्षण मंत्री दीपक केसरकर लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी आपल्याच पक्षाच्या किरण सामंत यांचे नाव टाळत भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे सरकवले आहे. त्यांच्या गप्प राहण्यातच सर्व काही आले आहे असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. भोसले म्हणाले, वडिलोपार्जित संपत्ती विकून राजकारण करत असल्याचे केसरकर म्हणत असले तरी त्यांनी स्वतः विकत घेतलेली प्रॉपर्टी ते विकत आहेत. ते न्यायालयात उघड झाले आहे. शिल्प ग्राम येथे आयोजित इंडिया महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत प्रवीण भोसले बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-लोकसभा-निवडणुकीच्या-अनु/

यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ ,राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, अशोक परब, देवेंद्र टेमकर, सावली पाटकर ,मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, शैलेश गोंधळकर, अँड राघवेंद्र नार्वेकर, अँड कौस्तुभ गावडे तसेच उपस्थित होते. भोसले पुढे म्हणाले, या ठिकाणी लोकसभा निवडणूकीत अद्याप पर्यंत महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. मात्र महाविकास आघाडीला डॅमेज करण्याचे काम संबंधितांकडून होत आहे, असे असले तरी आमच्या सोबत जनता आहे. त्यामुळे काही झाले तरी राऊतांचा तब्बल २ लाखांच्या मताधिक्याने विजय होणार आहे. मुळात केसरकर शिंदे शिवसेनेचे आहेत मात्र शिवसेनेच्या किरण सामंत यांचे नाव डावलून राणेंचे नाव पुढे करीत आहेत. तर या दोघांच्या रस्सीखेच मध्ये आपलीच वर्णी लावण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे एरव्ही आरोप प्रत्यारोप करणारे राजन तेली व दीपक केसरकर आज राजकीय दृष्ट्या जवळ आले असले तरी ते कदापी एकमेकांना साथ देणार नाहीत. त्यामुळे राजन तेली यांनी त्यामुळे त्यांच्या कार्यालयात जावून त्यांच्या आशेवर राहू नये उटल अर्लट राहावे. मोदी यांनी जनतेला सपशेल फसवले आहे. आज प्रचंड महागाई झाली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस सिलिंडर दरवाड, झाली आहे त्यामुळे गोरगरीब जनता चिंताग्रस्त झाली आहे. शेतकरी वर्गाच्या उत्पादनाला भाव नाही असे भोसले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here