Kokan: शिरोडा-वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजनाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; घोषणाबाजी व धक्काबुकीचा थरार !

0
12
शिरोडा वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजनाला विरोध
शिरोडा वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजनाला विरोध:;प्रकल्पग्रस्तांचा घोषणाबाजी व धक्काबुकीचा थरार

वेंगुर्ला, ता. १३: शिरोडा-वेळागर येथे होत असलेल्या ताज हॉटेल प्रकल्पाचा पायाभरणी सभारंभ ग्रामस्थांच्या मागण्या डावलून करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना स्थानिक ग्रामस्थांनी रोखले. यावेळी केसरकर यांच्या गाडीवर महिला ग्रामस्थ धावून गेल्या तर काही ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीत समोर आडवे झोपून विरोध दर्शविला. यावेळी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी उपस्थित पोलिसांकडून आक्रमक ग्रामस्थांना रोखण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. काही झाले तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका महिला ग्रामस्थांनी घेतली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

शिरोडा-वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजनाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; घोषणाबाजी व धक्काबुकीचा थरार !

शिरोडा वेळागर येथे ताज चा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प येत असून हा प्रकल्प १४० हेक्टर क्षेत्रात होणार आहे. मात्र यातील ३९ सर्व्हे नंबर व अतिरिक्त ९ हेक्टर जमीन यातून वगळावी यासाठी प्रकल्पग्रस्त गेली अनेक वर्षे शासनस्तरावर झगडत आहेत. मागील काही महिन्यापासून तर येथील जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासोबत प्रकल्प गस्ताच्या विविध बैठका झाल्या मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच या प्रकल्पाचे भुमिपूजन सभारभ आयोजित करण्यात आला होता. हे भुमिपूजन करण्यास आमचा विरोध नाही पण ही जमीन वगळण्यासंदर्भात निर्णय द्या नंतर भुमिपूजन करा असे प्रकल्प ग्रस्ताचे म्हणने होते. तसे पत्र द्या अशी आग्रही मागणी प्रकल्प ग्रस्ताकडून केली होती. पण या विरोधाला न जुमानता पर्यटन विभागाकडून प्रकल्पांसाठीचे भुमिपूजन रविवारी आयोजित केले होते. यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दोघे अधिकाऱ्यांसह सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे दाखल झाले. हे दोन मंत्री दाखल होताच प्रकल्प ग्रस्तानी जोरदार घोषणाबाजी केली तसेच मंत्र्यांच्या गाडीच्या आडवे येत गाड्या ही अडवल्या. यावेळी प्रकल्प ग्रस्ताकडून आत जाण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी पोलिसांकडून बॅरिकेटिग करत प्रकल्प ग्रस्ताना अडवले गेले. https://sindhudurgsamachar.in/kokanहुमरमळा-वालावल-गावातील-न/

यावेळी प्रकल्पग्रस्त व पोलीस यांच्यात जोरदार धक्काबुकी झाली. यात काही प्रकल्पग्रस्त जखमी झाले, पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करताना सौम्य लाठीमार केला तसेच प्रकल्पग्रस्तांना शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले होते. यामध्ये चार प्रकल्पग्रस्त जखमी झाले त्याना येथील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here