Kokan: शिवसेनेशी निष्ठावंत राहिलेल्या आ. वैभव नाईक यांचा आम्हाला अभिमान -भाई गोवेकर

0
75
आ. वैभव नाईक ,
शिवसेनेशी निष्ठावंत राहिलेल्या आ. वैभव नाईक यांचा आम्हाला अभिमान -भाई गोवेकर

मालोंड, वेरळ,देऊळवाडा, मसुरे गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पक्ष फोडण्यापलीकडे भाजपने काहीच काम केले नाही- आ.वैभव नाईक

महागाई करणाऱ्या भाजपला येत्या निवडणुकीत लोक हद्दपार करतील – संग्राम प्रभुगावकर

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

कुडाळ : शिवसेनेचे अनेक आमदार वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून शिंदे गटात गेले मात्र आमदार वैभव नाईक हे शिवसेनेशी आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी सत्तेसाठी आपल्या मतदारांचा विश्वासघात केला नाही त्यामुळे निष्ठावंत म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आजच्या बैठकीला लाभलेल्या उपस्थितीवरून आ. वैभव नाईक यांना किती पाठिंबा आहे हे दिसून येते.जनतेच्या पाठिंब्यामुळे आणि विश्वासाच्या जोरावर कुडाळ मालवण मध्ये पुन्हा एकदा भगवा फडकेल असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त करत देऊळवाडा येथील रमाईनदीतील गाळ काढून घेतल्या बद्दल आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-ना-रविंद्र-चव्हाण-यांच्य/

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी मालवण तालुक्यातील मालोंड, वेरळ,देऊळवाडा, मसुरे गावात केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आ. वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देत संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. आमदार वैभव नाईक म्हणाले, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जास्तीत जास्त निधी मालवण आणि कुडाळ तालुक्यात मंजूर करून आणला आहे. जिल्हयात शासकीय मेडिकल कॉलेज, महिला बाल रुग्णालय उभारून आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. रस्ते , पूल, यांसह पर्यटन विषयक विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. कोरोना व चक्रीवादळांच्या संकटात शिवसेनाच लोकांच्या मदतीला धावून गेली. यावेळी ठाकरे सरकार कडून जास्तीत जास्त मदत देण्यात आली. राणे गेले ५ वर्षे केंद्रात मंत्री आहेत त्यांनी मालवणसाठी काय दिले याचाही विचार जनतेने करावा. माजी खासदार जे इतरांवर आरोप करत आहेत. त्यांनी ५ वर्षे खासदार असताना मालवणात केलेले एकतरी काम दाखवावे. गेली दिड वर्षे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे मात्र पक्ष फोडण्यापलीकडे भाजपने काहीच काम केलेले नाही. अशी टीका आ. वैभव नाईक यांनी केली.

विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर म्हणाले, देशात भाजप सरकार आल्यापासून प्रत्येक वस्तूच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, टोमॅटो, कडधान्य यांच्या दारात बेसुमार वाढ कऱण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंही महागल्या आहेत.या महागाईत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. जनता मेटाकुटीला आली आहे. जनतेचा रोष निवडणुकीत मतदानातून व्यक्त होणार आहे. खावटी कर्ज माफी अद्याप पर्यंत मिळाली नाही. येत्या निवडणुकीत भाजपला लोक हद्दपार करतील असे संग्राम प्रभुगावकर यांनी सांगितले. यावेळी हरी खोबरेकर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख छोटू ठाकूर,युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम, पराग नार्वेकर, कृष्णा पाटकर, पोईप विभागप्रमुख विजय पालव, मसुरे सरपंच संदीप हडकर, धनंजय उर्फ आबा परब, माजी वेरळ माजी सरपंच आनंदी परब, देवूळवाडा उपसरपंच नरेंद्र सावंत, देवूळवाडा शाखाप्रमुख अशोक मसुरकर, सचिन परब, मसुरे पपू मुळीक, सचिन पाटकर, मालोंड चंद्रकांत मिठबावकर, देऊळवाडा सरपंच सुरेखा वायंगणकर, वेरळ शाखाप्रमुख सुरेश मापारी आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here