माझे राजकीय भवितव्य येणारा काळच ठरवेल
सावंतवाडी – : समाजसेवक म्हणून जनतेसाठी काम करणे हाच माझा नेहमी उद्देश आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मी कधीच कोणतेही कार्यक्रम घेतले नाहीत. त्यामुळे आमदार किंवा खासदार याबाबत होणारी चर्चा ही केवळ चर्चाच आहे. मी कोणाचा राजकीय स्पर्धक नाही किंवा मला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. मी भाजपचा छोटा कार्यकर्ता आहे.त्यामुळे माझे राजकीय भवितव्य हा येणारा काळच ठरवेल. ज्या युवकांनी मला आयडॉल ठरवले त्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी आगामी काळात जिल्ह्यात आयटी पार्क तसेच पर्यटनावर आधारीत प्रकल्प उभे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्वानी पुढे यावे, असे आवाहन भाजपा युवा नेते उद्योजक विशाल परब यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-विस्थापितांना-नुकसान-भर/
भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी सोमवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करण्यामागे विशाल परब यांचा राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. शहरात लागलेले बॅनर व व त्यांनी केलेली भाषणे यातून भविष्यात आमदार किंवा खासदारकीसाठी माझा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. परंतु असा कुठलाही हेतू किंवा स्वार्थ या मागे नसून केवळ आणि केवळ जनसेवा आणि समाजसेवक म्हणून मी काम करीत आहे. आपण या आधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथील जनतेला सहजरित्या पाहताना येणारे कार्यक्रम आयोजित केले आहे. भविष्यातही यापेक्षाही मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील परंतु त्यामध्ये माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नसणार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत त्यामुळे मी राजकीय स्पर्धेत आहेत असा गैरसमज कुणी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.