Kokan: सागर कवच बंदोबस्तात वहान तपासणीत आढळली गोवा बनावटीची दारु

0
81
:गोव्याहुन गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक केल्या प्रकरणी पुणे येथील इसमावर कारवाई
:गोव्याहुन गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक केल्या प्रकरणी पुणे येथील इसमावर कारवाई -

इनोव्हा कारसह 22 लाख 10 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त; वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-

सागर कवच बंदोबस्तावेळी होडावडा क्षेत्रपालेश्वर तिठा येथे थांबुन वेंगुर्लेकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना तळवडे दिशेकडुन वेंगुर्लेस येत असलेल्या एक इनोव्हा चार चाकी वाहनाच्या तपासणीत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी ठाणे-कल्याण येथील वैभव रघुनाथ सोनावणे याच्यावर वेंगुर्ले पोलीसांत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत वैभव सोनावणे याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इनोव्हा गाडीसह २२ लाख, १० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांना जप्त केला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-बंदरावरील-झुल/

सागर कवच बंदोबस्तावेळी होडावडा क्षेत्रपालेश्वर तिठा येथे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर कांडर, परशुराम उर्फ बंटी सावंत, विठ्ठल उर्फ बंड्या धुरी, सखाराम उर्फ दादा परब हे वेंगुर्लेकडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करीत असताना दि. २८ एप्रिल रोजी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारांस एम.एच.-०५-एफ.जी.-१०१० हि इनोव्हा कार आली असता तिची तपासणी या पथकाने केली. या तपासणी गाडीच्या डीकीत गोवा बनावटीच्या तीन प्रकारची नावे असलेल्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी पोलीस अमर कांडर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीसांत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत वैभव सोनावणे याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इनोव्हा गाडीसह २२ लाख १० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांना ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बंड्या धुरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here