Kokan: सातेरी माऊली मंडळ डिगंणे यांच्यावंतीने 24 डिसेंबर रोजी 49 साव्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन

0
93
वेंगुर्ल्याची ग्रामदेवता सातेरीचा जत्रोत्सव ७ रोजी
सातेरी माऊली मंडळ डिगंणे यांच्यावंतीने 24 डिसेंबर रोजी 49 साव्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन

सुनिता भाईप / ( सावंतवाडी ):

सातेरी माऊली मंडळ डिगंणे यांच्यावंतीने 24 डिसेंबर रोजी 49 साव्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन; अर्चना घारे-परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार आहे. गेली 49 वर्षे सातत्याने डिगंणे येथे कब्बडी स्पर्धा आयोजीत करण्यात येतात. यावर्षी सातेरी माऊली मंडळ डिंणे यांच्यावतीने 24 डिसेंबर रोजी आई प्रभावती सभागृह पाशीवाडी येथे माऊली चषक 2023 या 49 सहाव्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईक-यांनी-हिवाळी/

हि स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा कब्बडी खेळाडु संघटना यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन अर्चना घारे-परब यांच्याहस्ते सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार रूपये (10,000/- ) द्वितीय पारितोषिक सात हजार रूपये ( 7000/- ) तृतिय पारितोषिक पाच हजार रूपये ( 5000/- )व चषक ठेवण्यात आले आहे. हि स्पर्धा प्रथम येणार्या 16 संघामध्ये होणार आहे.खेळाडुची जेवणाची सोय मंडळाने मोफत केली आहे. ज्या संघाना सहभागी व्हायचे आहे त्या संघानी प्रदिप सावंत 9423213120 , प्रमोद सावंत 9881717944 ,यशवंत सावंत 7588817660 ,महादेव एम.डी.सावंत 940754291 , सुहास सावंत 9422054522 यांच्याशी संपर्क साधंण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here