Kokan: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले येथे रविवारी जाहीर सभा

0
11
महविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले येथे रविवारी जाहीर सभा
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले येथे रविवारी जाहीर सभा

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/वेंगुर्ले/प्रतिनिधी-

आज महाराष्ट्रातील हक्काचे प्रकल्प गुजरातला जाताहेत.त्यामुळे आपल्यावर आज अन्याय होतो आहे.मुंबई अदानीच्या घशात घालायचे प्रयत्न सुरू आहेत.कित्येक कोटीचा भ्रष्टाचार केलेल्यांचे पुनर्वसन केले जात आहे.त्यामुळे आज परिवर्तन घडवायचे आहे.त्यासाठी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आपला परिपूर्ण विकास घडविण्यासाठी मशाल चिन्ह ला साथ द्या , असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना युवा नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ले येथे केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-ही-माझी-शेवटची-निवडणूक-क/

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले येथे रविवारी जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.ठाकरे पुढे म्हणाले ,आज कोकणात चांगले प्रकल्प आणावयाचे असतील तर मविआ चे सरकार येणे आवश्यक आहे.येथील कोकणातील आंबा , काजू उत्पादन ला जागतिक दर्जावर न्यायचे आहे , त्यासाठी आपले हक्काचे सरकार आवश्यक आहे. येथील शालेय शिक्षणमंत्री शिक्षणाचा दर्जा वाढवू शकले नाहीत.त्यामुळे या भागातील बेरोजगारांना काम द्यावयाचे आहे.आपले सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना महिना ३००० रुपये देणार ,महिलांसाठी मोफत एस टी प्रवास ,व्यापक प्रमाणावर महिला पोलीस भरती ,प्रत्येक बेरोजगारीला महिना ४००० रुपये आपले सरकार आल्यावर देणार ,असे त्यांनी घोषित केले.

गेली १५ वर्षे दिपक केसरकर यांनी अगदी निष्क्रियपणे काम केले, त्यामुळे या निवडणुकीत जागरूकतेने मतदान करून राजन तेलीना निवडून आणा , असे यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले यावेळी उमेदवार राजन तेली , शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी , माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर , माजी नगराध्यक्ष संदेश निकम , राष्ट्रवादीच्या नम्रता कुबल , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख , शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ , माजी सभापती जयप्रकाश चमणकर , माजी नगरसेवक प्रकाश डिचोलकर , माजी जी प सदस्य सुकन्या नरसुले , ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब , शहरप्रमुख अजित राऊळ , राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर , सुमन निकम , अस्मिता राऊळ , ठाकरे पक्षाचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत ,उपराज्यप्रमुख सुभाष केळकर , श्री.रावराणे , रितेश जाधव ,लक्ष्मण आयनोडकर ,युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट , उपतालुकाप्रमुख उमेश नाईक आदीसह म वी आ चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन यशवंत परब यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here