Kokan: सिंधुदुर्ग राजाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

0
106
सिंधुदुर्ग राजाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
सिंधुदुर्ग राजाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
  • सिंधुदुर्ग: -मुंबई येथील लालबागच्या राजाची प्रतिकृतीच भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ भाजप कार्यालया समोर “सिंधुदुर्ग राजा”ची स्थापना करण्यात आली आहे.गेली १३ वर्षे सिंधुदुर्ग राजाचे पूजन ११ दिवस केले जात होते.यंदाचे हे १४ वे वर्षे असून तसेच यंदा पहिल्यांदाच आता सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन तब्बल १७ दिवस भाविकांना घेता येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-१-ऑक्टोबरपासून/

गणेश चतुर्थी दिवशी पुजन केलेल्या सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनाला जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.तर भाजप तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम यावेळी राबवले जात आहे.भाविकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे.तर नारायण राणे यांचे कार्यकर्ते तसेच भाजपचेही कार्यकर्ते या सिंधुदुर्ग राजाची सेवा दिवस रात्रभर करताना दिसत आहेत.तर विविध पक्षाचीही मंडळी या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन व आशीर्वाद घेत आहेत. त्यामुळे येथील वातावरण भक्तीमय झालेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here