२८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान
रिक्षा व्यवसायिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैभव नाईक यांनी केले कौतुक
सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघ ओरोसचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज ओरोस फाटा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रिक्षा व्यवसायिक आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवित आहेत त्याबद्दल वैभव नाईक यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून वैभव नाईक यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/


याप्रसंगी रिक्षा चालक मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर, माजी उपसभापती जयभारत पालव, रानबांबूळी माजी सरपंच वसंत बांबूळकर, रवी कदम, भगवान परब, सतीश सावंत, प्रवीण शिरसाट, अनिल ओरोसकर, सचिन आंगणे, दिगंबर गोसावी, भिसाजी परब, दिलीप मुळये आदींसह रिक्षा चालक मालक सेवा संघाचे संचालक व सभासद उपस्थित होते