Kokan: हुमरमळा नाका येथे सायबर सुरक्षा, व्यसन मुक्तीसाठी पथनाट्य सादर

0
6
व्यसन मुक्तीसाठी पथनाट्य सादर
हुमरमळा नाका येथे सायबर सुरक्षा, व्यसन मुक्तीसाठी पथनाट्य सादर

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ l मनोज देसाई

मोबाईल आणि सायबर सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाढत्या व्यसनांच्या दृष्टीने नागरीकांना सजग करण्यासाठी निवती पोलिस स्टेशन, चेंदवण माऊली हायस्कूलच्या वतीने, तसेच हुमरमळा ग्राम पंचायत आदींच्या सहकार्याने, हुमरमळा नाका येथे पथनाट्य सादर करण्यात आले. सायबर सुरक्षा कशी करावी, तसेच व्यसनांच्या विळख्यात जाणा-या पिढीला , संबोधुन सदर पथनाट्य चेंदवण माऊली हायस्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांनी सादर केले. हुमरमळा नाका येथे सोमवारी सकाळी याचे आयोजन करण्यात आले होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भारतीय-नौदल-आणि-जावा-येझ/

यावेळी प्रभारी निवती पोलिस स्टेशन निरीक्षक भिमसेन गायकवाड, पोलिस कर्मचारी दिलीप शेट्ये, हुमरमळा बिट हवालदार , हुमरमळा सरपंच अमृत देसाई, कीर्तनकार स्नेहल सामंत, ग्राम विस्तार अधिकारी अपर्णा पाटील, हायस्कूल शिक्षक संतोष सांगळे, हुमरमळा पोलिस पाटील सुबोध सावंत, चेंदवण पोलिस पाटील उमेश शृंगारे ,शेळपी पोलिस पाटील सौ. प्रतिक्षा मुंडये, कवठी पोलिस पाटील व पत्रकार विठ्ठल राणे, बाबल निवतकर , चेंदवण माऊली हायस्कूल चे विद्यार्थी, कर्मचारी, हुमरमळा ग्रामस्थ,
आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here