वेंगुर्ला प्रतिनिधी- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिधुदुर्गतर्फे २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत कालवी बंदर येथे ‘अंकुरम‘ ह्या हिवाळी शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिराच्या अंतिम टप्प्यात कणकवली शहर व संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ ह्या दोन शाखांच्या कार्यकारीणी घोषणा करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-बॅ-खर्डेकर-यांचे-इंग्रजी/
तत्पूर्वी या शिबिरात खेळ, संघ बांधणी कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास आदींवर भर देण्यात आला. शिबिरात २२ विद्यार्थीनी व २३ विद्यार्थी मिळून एकूण ४५ जण सहभागी झाले होते. शिबिर प्रमुख म्हणून आदर्श गायकवाड याने जबाबदारी पाहिली. शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा संयोजक अथर्व शृंगारे, जिल्हा सहसंयोजक चिन्मयी प्रभू, जिल्हा प्रमुख अवधूत देवधर, सावंतवाडी शहरमंत्री स्नेहा धोटे यांच्यासह कालवी बंदर येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – कालवी बंदर येथे झालेल्या ‘अंकुरम‘ शिबिरात ४५ जण उपस्थित होते.