वेंगुर्ला प्रतिनिधी- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन सिधुदुर्ग समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते एन.पी.मठकर यांची निवड करण्यात आली. या समितीची बैठक कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये अॅड.राजीव बिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.https://sindhudurgsamachar.in/kokan-पेंडूर-मातोंड-व-खानोली-ग/
या बैठकीत शासनाच्या निर्देशानुसार येत्या वर्षभरात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्था येथे जादूटोणा प्रतिबंधक कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत व्याख्यान आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष डॉ.संजिव लिगवत, जिल्हा संघटक विजय चौकेकर, सचिव अजित कानशिडे, जिल्हा महिला संघटक रूपाली पाटील, मार्गदर्शक डॉ.सतिश पवार, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, सावंतवाडी तालुका संफ प्रमुख फिलिक्स फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा कुडाळकर, प्रभाकर चव्हाण, अनुश्री चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटोओळी – एन.पी.मठकर यांना सदस्यपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.