Kokan: अणसूर पाल हायस्कूलची प्रतिकृती प्रथम

0
13
विज्ञान प्रदर्शन,
अणसूर पाल हायस्कूलची प्रतिकृती प्रथम

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / वेंगुर्ला /प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अणसूर पाल हायस्कूलमधील दहावीतील साहिल गावडे याने विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी उपयुक्त ठरणा­­-या, अल्पखर्चिक सुक्ष्मदर्शक, प्लास्टोस्कोप या विज्ञानप्रतिकृतीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला. https://sindhudurgsamachar.in/kokan-परिसरात-ठिकठिकाणी-श्री-द/

कु. साहिल याला विज्ञान शिक्षक विजय ठाकर यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षक व साहिल गावडे यांना गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, जिल्हा विज्ञान मंडळ संचालक संतोष पवार आदी उपस्थित होते.

याच हायस्कूलमधील सोहम अणसूरकर याने जल अपव्यय टाळण्यासाठी स्मार्ट जलबचतदर्शक यंत्र ही विज्ञान प्रतिकृती सादर केली. तर धनश्री गावडे, वेदांत गावडे, समिक्षा गावडे, साहिल गावडे, श्रेयश मालवणकर, वेदांत आमडोसकर यांनी वक्तृत्व, निबंध आणि प्रश्नमंजूषामध्ये सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अणसूर पाल विकास मंडळ, मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, ट्रेझरर बाळकृष्ण तावडे, शालेय समिती अध्यक्ष एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू गावडे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारुता परब यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here