कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघातील भरणी गावातील सरपंच अनिल बागवे हे निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यास आमदार नितेश राणे यांना भेटण्यास गेले असता त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने व गावात विकासकामे होत नसल्याने त्यांनी आपल्या सदस्य सहकार्यांना सोबत घेऊन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अनिल बागवे यांच्यासह राधिका पाटकर, मनीषा तांबे, अक्षय गुरव, रमेश जगताप, मंगेश पालकर, प्रकाश बागवे आदी सदस्य व ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-वेतोबा-वर्धापनदिना/
याप्रसंगी बोलताना श्री विनायक राऊत यांनी सर्वांना आपल्या पक्षात आपुलकीने वागावले जाईल व उचित सन्मान राखत गावाच्या विकासासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासित करण्यात आले. सदर प्रवेशाच्या वेळी पक्षाचे विधानसभा संपर्कप्रमुख सतीश सावंत, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, रामू विखाळे, सुनील बागवे, विश्वनाथ दळवी, मोहन तांबे, संजय सावंत, गणपत गुरव आदी मान्यवर व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.