Kokan: अभियानाच्या माध्यामातून विविध सोयीसुविधा निर्माण करा- तहसिलदार ओतारी

0
103
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ अभियान,
विद्यार्थी व शाळा यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी यांचे बहुमोल योगदान असते आणि या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

वेंगुर्ला प्रतिनिधी- विद्यार्थी व शाळा यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी यांचे बहुमोल योगदान असते आणि या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-मॅरेथॉनमध्ये-सदू-स्पोटर/

अणसूर पाल हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियानाचा शुभारंभ तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाला. पुढे बोलताना ते म्हणाले की,  खेळ हे आपले करिअर घडविण्यासाठी उत्तम माध्यम आहे. वेटलिफ्टींग खेळातील सातत्यपूर्ण कठोर मेहनत, अभ्यास आणि जिद्द यांच्या जोरावर आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल मिळविली आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालो. खेळाच्या माध्यमातूनच स्वतः आपल्याला महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय सेवेची सुसंधी प्राप्त झाली असून, अभ्यास आणि खेळातून करिअरच्या विविध सुसंधी उपलब्ध आहेत हे जाणून घेवून, विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी ध्येयाची आखणी करा.   यावेळी शालेय समिती सदस्य दिपक गावडे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, स्नेहसंमेलन प्रमुख चारुता परब, शिक्षक अक्षता पेडणेकर, विजय ठाकर, माजी विद्यार्थी स्वप्नील गावडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

      दरम्यान, याचवेळी घेतलेल्या ‘रंगशिशिर‘ स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वादन, विविध संदेश देणा-या नाटिका, विनोदी लघुनाट्य असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.

फोटोओळी – अणसूर पाल हायस्कूलमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियानाचा शुभारंभ तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here