Kokan: “अलिबाग तालुक्यातील समस्यांचा वेध”या विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन

0
163
"अलिबाग तालुक्यातील समस्यांचा वेध या विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था चळवळीचे यावर्षी ७५ वे वर्ष साजरे करीत असताना संस्थेच्या वतीने विविध उपक्रम – कार्यक्रम राबविले जात आहेत.  हीरक महोत्सवाच्या निमित्ताने दि ३१ मे रोजी दैनिक कृषीवल कार्यालयास विधानपरिषदेचे आमदार आणि शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राज्यपुरस्कार प्राप्त व्यसनमुक्ती कार्यकर्ते रमेश सांगळे यांचे “व्यसनांचे गांभीर्य” याविषयावर मार्गदर्शन होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-एसटी-कामगार-सेना-सिंधुदु/

त्याचप्रमाणे गुरुवार, दिनांक १ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता  “अलिबाग तालुक्यातील समस्यांचा वेध” या विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रिझर्व्ह बँक विश्रामगृह, बुलंद, प्रधान अली, दक्षिणमुखी मंदिराजवळ, नागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास दैनिक कृषीवलच्या मुद्रक आणि प्रकाशक मा सौ चित्रलेखा पाटील, दैनिक पुढारी रायगड आवृत्ती प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार जयंत धुळप, अलिबाग तालुक्यातील सामाजिक  कार्यकर्ते आणि प्रभादेवीतील शाखाप्रमुख संजय भगत, उद्योजक राजन नार्वेकर, प्रकाश ठाकूर, उद्योजिका जान्हवी (मीरा) सावंत आदी मान्यवर उपस्थित  राहणार असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी सांगितले आहे.

अलिबाग तालुक्यातील दैनिकातून शहरी आणि ग्रामीण भागातून सातत्याने लेखन करून जनसामान्यांना भेडसवणाऱ्या प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार, वृत्तपत्रलेखक यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि कार्यक्रमाला उपस्थिती राहू इच्छिणाऱ्यांनी ९३२३११७७०४ या मोबाईलवर संपर्क  साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here