Kokan: अल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे दळ्यात भात रोपे लावून अनोखे आंदोलन

0
25
अल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे दळ्यात भात रोपे लावून अनोखे आंदोलन

सन १९६७ साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत अल्युमिनियम प्रकल्प करण्याचे ठरले होते. या जमिनीत उत्पन्न घेत आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिहीन करुन भांडवलदारांना सरकारने जमिनी दिल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-शाळकरी-मुलांसाठी-शिरगाव/

या जमिनी परत मिळवण्यासाठी गेली सुमारे ५३ वर्षे लढ़ा दिला जात आहे. याची कोणतीही दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या अल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी यांनी येथील जमिनीचा ताबा घेवून शेती करणार असल्याचा इशारा दिल्याप्रमाणे ९ जुलै रोजी शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा घेऊन शेती केली. मंगळवारी प्रतिनिधिक स्वरूपात एका दळ्यात भात रोपे लावून हे अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात अनेक प्रकल्पग्रस्त देखील सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here