Kokan: अळंबीची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना झाली विषबाधा

0
23
अळंबीची भाजी,विषबाधा,
अळंबीची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना झाली विषबाधा

तिघा जणांची प्रकृती गंभीर अधिक उपचारासाठी गोवा -बांबोळीत पाठवण्यात आल
सावंतवाडी- 
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव -कुंभारवाडी येथे अळंबीची भाजी खाल्ल्याने एकाच कुंभार कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाली. त्यातील तिघा जणांची प्रकृती अस्वस्थ असल्याने गोवा -बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्या त त्यांना हलवण्यात आले आहे. रविवारी दुपारी जेवणा सोबत या सर्वांनी अळंबीची भाजी खाल्ली होती .मात्र , काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी या सर्वांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . जेवणातील अळंबी खाल्ल्याने त्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दिव्या कुंभार, दीपक कुंभार, गुणवंती कुंभार, दुर्वा कुंभार, निखिल कुंभार, नामदेव कुंभार, राजन कुंभार (सर्व राहणार कोलगाव) तसेच सोनाली चंद्रकांत कुंभार व चंद्रलेखा चंद्रकांत कुंभार (दोघेही राहणार मळेवाड) अशी त्यांची नावे आहेत. दीपक कुंभार, दुर्वा कुंभार, राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. सहा जणांवर सावंतवाडीत उपचार सुरू आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-स्ट-समितीचे-माजी-अध्यक्/

कोलगाव कुंभारवाडी येथील कुंभार कुटुंबीयांनी आज दुपारी जेवणाबरोबर अळंबीची भाजी केली होती कुंभार कुटुंबातील दीपक कुंभार यांनी अळंबी आणली होती त्यांच्याकडे मळेवाड येथील नातेवाईक सोनाली कुंभार व चंद्रलेखा कुंभार या दीपक कुंभार यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्या करिता रविवारी आल्या होत्या. सर्वांनी दुपारी एकत्रित जेवण केल्यानंतर सर्वांना लगेच उलटी व जुलाब यांचा त्रास सुरू झाला. स्थानिकांना ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी सर्व अत्यवस्थ नऊही जणांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देसाई त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. दीपक कुंभार, दुर्वा कुंभार व राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here