Kokan: असंघटित बांधकाम कामगार नोंदणी कक्षाचा शुभारंभ

0
24
असंघटित बांधकाम कामगार नोंदणी कक्षाचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाने राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांसाठी केलेल्या योजनेचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांना व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनेनुसार वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेतर्फे असंघटित बांधकाम कामगारांची या योजनेसाठी मोफत नावनोंदणी व मोफत नूतनीकरणासाठीचा कक्ष वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यालयात २३ जुलैपासून सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते नोंदणीचे फॉर्म वितरित करून झाला.https://sindhudurgsamachar.in/kokan-कल्पवृक्ष-अकॅडमीतर्फे-ग/

      यावेळी तालुका प्रमुख नितीन मांजरेकरशहर महिला संघटक अॅड.श्रध्दा बाविस्करअल्पसंख्यांक महिला शहर प्रमुख शबाना शेखमहिला संघटक मनाली परबशहर युवक प्रमुख संतोष परबबांधकाम कामगार प्रतिनिधी किरण कुबलप्रभाकर पडतेसंजय परबबाळा परब आदी उपस्थित होते.

      असंघटित बांधकाम कामगारांना १८ ते ६० वयोगटापर्यंत लाभ मिळतो. हा लाभ ६० वर्षानंतर पुढे मिळत नाही. ही बाब काही बांधकाम कामगारांनी लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे अशा ६० वर्षे उलटलेल्या बांधकाम कामगारांना ७० वर्षापर्यंत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करून न्याय दिला जाईल असे आश्वासन शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी दिले.

      असंघटीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी लागणा-या कागद पत्रात ग्रामसेवक दाखला लागतो तो देण्यास टाळाटाळ होते. या बांधकाम कामगारांच्या तक्रारीनुसार शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व शहर प्रमुख उमेश येरम यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली असता आपण स्वतः लक्ष घालून ही समस्या सोडविन असे गटविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले.

      यावेळी बांधकाम कामगार प्रतिनिधी किरण कुबल यांनी बांधकाम कामगार नवीन नोंदणी व नुतनीकरण या संदर्भात लागणारी कागदपत्रे व योजनेत होणा-या लाभाविषयी माहिती दिली. तर या योजनेत बांधकाम कामगारांच्या मुलांना शालेय शिक्षणासाठी या योजनेचा फायदा होतो असे स्पष्ट केले. या असंघटित बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीसाठी ८० जणांनी सहभाग घेत नोंदणी फॉर्म घेतले.

फटोओळी – असंघटित बांधकाम कामगार नोंदणी कक्षाचा शुभारंभ उमेश येरम यांच्या हस्ते नोंदणीचे फॉर्म वितरित करून झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here