नांदगाव विभागातर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा सत्कार
नांदगाव – भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सत्ता येणार आहे. भाजपा नेतृत्वाविरुद्ध जनमानसात चीड निर्माण झाली आहे.त्यामुळेच सत्ताधारी निवडणुकांपासून पळ काढत आहेत.आगामी निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी जोमाने काम करा.आता जिल्हाप्रमुख या नात्याने संपूर्ण ताकद शिवसैनिकांना दिली जाईल,असा विश्वास नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केला.https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईक-यांची-राजकीय/
नांदगांव पंचायत समिती विभागातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख पदी संदेश पारकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते. सिंधुदुर्गात राणे भाजपाला रोखण्यासाठी गावागावातून आवाज उठवला पाहिजे.स्थानिक आमदारांचे अपयश लोकांपर्यत पोहोचवा .आगामी काळात आपण संघटित लढा दिला तर विजय निश्चित असेल,असेही श्री.पारकर म्हणाले.
यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले,उपविभाग प्रमुख तात्या निकम, प्रदीप हरमलकर, आबू मेस्त्री, इमाम नावळेकर, शाखाप्रमुख संजय डगरे, आनंद तांबे, लक्ष्मण लोके,दीपक कांडर,अनिल नरे,मनोज लोके, अब्दुल नावलेकर, खुदबुद्दीन नावलेकर, याकुब नावलेकर ,इरफान नावलेकर ,रोहन जोशी, अंजर बटवाले, सोहेल सुभेदार, दयानंद लोके, संतोष नरे आदींसह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.