Kokan: आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक ; अर्ज छाननीत सर्व उमेदवारी अर्ज वैध

0
64
निवडणुक,आचारसंहिता
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

25 ऑक्टोबर दुपारी 3 पर्यत उमेदवार अर्ज मागे घेण्याची मुदत : त्यानंतर होणार चिन्ह वाटप
मालवण : आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी दाखल ७ तर सदस्य पदासाठी दाखल ३५ उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया सोमवारी पंचायत समिती शिक्षण विभाग येथे करण्यात आली. यात सर्व अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, बुधवार 25 ऑक्टोबर दुपारी 3 पर्यत उमेदवार अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदीप महादेव गावडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/kokanमालवण-व-देवगड-येथे-मासेमा/

आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष पुरस्कृत व अपक्ष अश्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर, आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून चिन्ह वाटप केले जाणार आहे. किती उमेदवार रिंगणात हे निश्चित होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here