Kokan: आजी – आजोबा दिवस साजरानातवंडे शाळेत शिकण्याने आजी – आजोबांना होणारा आनंद अविस्मरणीय: -शिक्षणमंत्री दीपक केसरकर

0
89

सिंधुदुर्ग:-आपल्या नातवांना शाळेत शिकताना पाहून आजी- आजोबांना होणारा आनंद हा अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे आजी-आजोबा दिवस संपन्न झाला. यावेळी कळसुलकर इंग्लिश स्कूल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रदीप कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना गोडके, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, प्राचार्य श्री. मानकर आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-रेल्वेचा-१४-रोजी-मेग/

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले, एकत्रित कुटुंब पध्दती ही भारताची संस्कृती आहे. ही संस्कृती आपण जपत असताना आजी-आजोबाचा सहवास विद्यार्थी जीवनामध्ये महत्वाचा असतो. अनेक इंग्रजी शाळांमध्ये ग्रँड पॅरेंन्ट्स डे साजरा केला जातो. एरवी आजी -आजोबांना शाळेत जायला मिळत नाही. आजी-आजोबा दिवसानिमित्त त्यांना नातवंडांच्या वर्गापर्यंत थेट जाता येवू शकते. आपला नातू किंवा नात कोणत्या वर्गात शिकतात , ते शाळेत काय काय शिकतात हे आजी -आजोबांना पाहता येते. यानिमित्ताने मुलांच्या आई-वडीलांना आपल्या आजी-आजोबांचं महत्व सुध्दा निश्चितपणे समजेल असे सांगून ते म्हणाले, मुलांची मानसिक स्थिती सुधारावी यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. शासनाच्यावतीने यावर्षीपासून जेष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरु करण्याचे ठरविले आहे.

जेष्ठांची योग्य ती काळजी घेतली पाहीजे. या शाळेत मी सुध्दा शिक्षण घेतलं आहे. या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी योग्य ती मदत करणार. शिक्षण विभागाच्यावतीने अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवित आहोत. त्यामध्ये सरकारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देत आहोत. इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जेवढ्या वह्याचे पाने लागतात ती सर्व वह्याची कोरी पाने ही पुस्तकामध्ये धडा संपल्यानंतर जोडण्यात आलेली आहेत. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात 30 हजार व दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या भरतीची सुरुवात झालेली आहे. पूर्वी पेक्षा अधिक शिक्षणसेवकांचे मानधन वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळायला हवे, ही शासनाची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात सिंधुदुर्गात कोडिंग- डिकोंडिग चे प्रशिक्षण सुध्दा देण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here