प्रतिनिधी — अभिमन्यु वेंगुर्लेकर
- वेंगुर्ला – आडेली खुटवळवाडी येथे जेष्ठ नागरिकांसाठी शासनाचे मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. खुटवळवाडीच्या वॉर्ड क्रमांक २८ मध्ये ६५ वर्षे वरील जेष्ठ नागरिकांसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-हजारो-शिवप्रेमींच्या-जय/
- मुख्यमंत्री वयोश्री योजनानेद्वारे, राज्य सरकारकडून 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत DBT.14 द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
सध्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 325 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. 135 जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या ओळखीसाठी मूल्यांकन शिबिरे पूर्ण झाली आहेत, त्यापैकी (25.01.2019 पर्यंत) 77 वितरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, ज्याचा लाभ BPL श्रेणीतील 70939 ज्येष्ठ नागरिकांना झाला आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी मुख्य निकष म्हणजे ते बीपीएल कुटुंबातील आहेत आणि त्यांच्याकडे संबंधित प्राधिकरणाने जारी केलेले वैध बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.