Kokan: ‘आता माघार नाही रडायचं नाही लढायचं ‘ असा नारा देत अर्चनाताई घारे -परब निवडणूक रिंगणात

0
22
अर्चनाताई घारे -परब निवडणूक रिंगणात
सौ. अर्चना घारे परब यांना उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – सावंतवाडी-

‘महविकास आघाडीची उमेदवारी मला मिळेल अशी खात्री होती. वरिष्ठांनी खरचं खुप प्रयत्न केले मला उमेदवारी मिळावी यासाठी. मात्र वरिष्ठ पातळीवर काही तडजोड करावी लागते. तिकीट न मिळाल्याने खूप वाईट वाटल. आघाडीतील कुठल्याही नेत्यांवर नाराज नाही. मात्र अपक्ष फॉर्म भरणार आहे.’ अस अर्चना घारे यांनी केलं स्पष्ट आणि जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज केला दाखल ! https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवण-शहरातील-युवकांचा-आ/

मतदार संघातील प्रत्येक घटकासाठी कार्य केलं. गेली अनेक वर्षे कार्य केलं. यासाठी दिवस रात्र एक केली. वैयक्तीक आयुष्यावर दुर्लक्ष केलं. सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे कॉल आले. सर्व महिलांनी आता पदर खोचला आहे. आता रडायचं नाही तर लढायच. अर्चना घारे यांनी दिले लढण्याचे संकेत. आजच फॉर्म भरणार..असा निर्णय घेवून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्चना घारे-परब यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

सावंतवाडी मतदारसंघात मोठी लढत होण्याची शक्यता.
सावंतवाडी मतदार संघात गेली आठ वर्ष सतत कार्यरत असलेल्या अर्चना घारे-परब यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी सावंतवाडी येथील वैश्य येथील सभागृहात जाहीर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. गेली आठ वर्षे आपण या मतदारसंघात काम करत असताना येथील सर्व सामान्य मतदारांच्या समस्या जाणुन घेतल्या त्या सोडविण्यासाठी येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हा सर्वांनच्या आशीर्वादाने आपण ही निवडणूक लढविणार आहे.

‘आता माघार नाही रडायचं नाही लढायचं ‘ असा नारा देत निवडणूक लढणार असल्याच जाहीर केल. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते , ग्रामस्थ व महिलां यांनी अर्चना घारे-परब यांनी हि निवडणूक लढवावी यासाठी समर्थन दिले. मेळाव्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सौ. अर्चना घारे-परब यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी कार्यालयात सादर केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व सर्व सामान्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here