Kokan: आंबडवे महाविद्यालयात वाचन पंधरवड्यानिमित्त व्याख्यानमाला

0
14
आंबडवे महाविद्यालय,
आंबडवे महाविद्यालयात वाचन पंधरवड्यानिमित्त व्याख्यानमाला

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली-

आंबडवे, ता. मंडणगड येथील विश्वभूषण भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाचन पंधरवड्यानिमित्त ‘वाचन संस्कृती- काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाचक- लेखक संवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-tvs-मोटर-कंपनी-भारत-मोबिलिट/

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग व मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनेनुसार आंबडवे येथील उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयात वाचन पंधरवडा साजरा होत आहे. यानिमित्त येथील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच वाचन पंधरवड्याचा एक भाग म्हणून महाविद्यालयात नुकतीच ‘वाचन संस्कृती- काळाची गरज’ या विषयावर आधारीत व्याख्यानमाला पार पडली. दापोली येथील प्रथितयश साहित्यिक, पत्रकार व अभ्यासक सुदेश मालवणकर यांनी सध्याच्या व यापुढील काळात ‘सुजाण माणूस’ म्हणून जगायचे असेल तर आपण काय काय वाचले पाहिजे, का वाचले पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर याच कार्यक्रमात वाचक- लेखक संवाद कार्यक्रम साजरा झाला. कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांनी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी पुस्तकांबरोबरच माणसे, चेहरे, समाज आणि निसर्गाचे ‘वाचन’ करावयास हवे. विद्यार्थ्यांना आपल्या गावाबद्दल, परिसराबद्दल, परिसरातील निसर्ग, परिसंस्था, पर्यावरण आदींबाबत माहिती निश्चित असावयास हवी असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह बी.एम.एस. विभाग प्रमुख प्रा. अमोल राजेशिर्के, ग्रंथपाल डाॅ. दिगंबर हेमके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी गंबर यांनी केले, तर कोमल पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here