🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी –
फोटोओळी – आरोग्य शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश नाईक आणि माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर यांच्या हस्ते झाले.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-रामेश्वर-मंदि/
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, जिल्हा रुग्णालय ओरोस, सामाजिक कार्यकर्ते पंकज शिरसाट व गद्रे नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा ८२ जणांनी लाभ घेतला. यात कर्मचा-यांची मोफत आरोग्य, रक्त, दंत व नेत्र तपासणी तसेच मोफत उपचार करण्यात आले.
उद्घाटन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश नाईक आणि माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, नागेश गावडे, उमेश येरम, सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ, ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बाळू परब, प्रा.भेंडवडे, नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, नीशा आळवे, बापू वेंगुर्लेकर, जिल्हा रूग्णालयाच्या स्त्री रोग तज्ज्ञ करंबळेकर, दंत चिकित्सक डॉ.घाकोरकर, आयुष विभागाचे डॉ.गोडकर, स्टाफ नर्स तृप्ती जाधव, सावली वेंगुर्लेकर, अनिता बिबवणेकर, समुपदेशक हर्षदा मुणनकर, गद्रे नेत्र रूग्णालयाचे उदय दाभोलकर, वैष्णवी दाभोलकर, रमिता गावडे, ऐश्वर्या जाधव, तेजस वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले.