मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण समारंभ आज मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आ. वैभव नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबईस्थित-कुडाळ-मालवण-व/
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्राचार्य कैलास राबते,विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, उद्योजक दीपक परब, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेश सरनाईक,मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे, वेशभूषा नेपथ्यकार तारक कांबळी, भाऊ सामंत, चंद्रकांत सामंत, नितीन वाळके आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.