शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रचारात आघाडी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवून २००० रू. करणार-पूनम चव्हाण
प्रतिनिधी पांडुशेठ साठम
महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून शिवसेनेच्या सर्वच घटकांमधून आमदार वैभव नाईक यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी प्रचाराचा झंझावात जोरदार चालू आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देवबाग, मसुरे, आचरा या ठिकाणी महिला वर्गाच्या गाठीभेटी घेवून आमदार वैभव नाईक यांनी केलेली विकास कामे तळागाळातील महिला वर्गाला समजावून सांगत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान केले आहे. एकंदरीत मालवण तालुक्यात आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराने मुसंडी घेऊन शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दोडामार्ग-तालुक्याचा-स्/
यावेळी गावागावात मार्गदर्शन करताना महिला तालुका समन्वय पूनम चव्हाण म्हणाले की आमदार वैभव नाईक हे स्त्री शक्तीचा आदर करतात त्यांनी महिला वर्गासाठी कुडाळ येथे सुसज्ज महिला व बाल रुग्णालय उभारले आहे. त्याचबरोबर शासकीय मेडिकल कॉलेज सुरू केले, मालवण मध्ये 43 कोटींची नळयोजना मंजूर केली. शेतकर्यांना अत्याधुनिक शेती अवजारे दिली असून मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी सोडवून मतदारसंघाचा विकास केला आहे तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाढवला जाणार असून तो 2000 रुपये करणार असल्याचे पुनम चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे.
यावेळी प्रचारात शिवसेना मालवण तालुका संघटक दीपा शिंदे,रश्मी परुळेकर,शिल्पा खोत, निना मुंबरकर,विद्या फर्नांडिस, मंदा जोशी,नंदा सारंग,निनाक्षी मेथर, रूपा कुडाळकर,रवीना लुडबे,लक्ष्मी पेडणेकर आदी महिला पदाधिकारी प्रचारात सहभागी झाल्या होत्या.