निष्ठावंत आणि कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईक यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
बिळवस – आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघासाठी तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे बिळवस गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर सिंहासारखं! निष्ठावंत म्हणून आ. वैभव नाईक यांची त्याच पद्धतीने वाटचाल सुरू आहे. वैभव नाईक आमदार होण्यासाठी सातेरी देवीकडे आम्ही सर्व बिळवस ग्रामस्थ साकडं घालणार आहोत.तुम्ही आमदार तर होणारच आहात आणि आमदार झाल्यानंतर तुम्ही पालकमंत्री होऊन याठिकाणी यावे अशी आमची देवीकडे प्रार्थना आहे. निष्ठावंत म्हणून आ. वैभव नाईक यांच्यासारख्या सच्चा व्यक्तींची आज गरज आहे. आम्ही तुमचे व्यक्तिमत्व जपणार आहोत.असे उद्गार बिळवस गावचे नागरिक भावेश पालव यांनी काढले. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्पर्धा-परीक्षा-ही-काळाच/
बिळवस गावात आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी गावभेट दौरा केला. यावेळी बिळवस गावातील ग्रामस्थांशी आ. वैभव नाईक यांनी संवाद साधला. गावातील समस्या जाणून घेतल्या. शिवसेना संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. गावातील उर्वरित विकास कामे येत्या काळात मार्गी लावू अशी ग्वाही दिली.
यावेळी भावेश पालव यांनी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून बिळवस गावामध्ये झालेल्या विकास कामांची माहिती दिली. त्यामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख , मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत बिळवस रस्त्यासाठी १.५० कोटी, जलमंदिर सुशोभीकरण ५ लाख, जलमंदिर नजिक संरक्षण भिंतीसाठी १० लाख, जिल्हा वार्षिक योजनेमधून धाकु धाम ते जलमंदिर रस्ता १० लाख,प्रजिमा ३२ ते सातेरी जलमंदिर रस्ता ५ लाख, बीएसएनएल टॉवर आदी कामे बिळवस गावामध्ये करण्यात आली. त्यामुळे निष्ठावंत आणि कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईक यांचा बिळवस ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सूर्यकांत पालव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर ,मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर,युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले,उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर,महिला तालुका समन्वयक पुनम चव्हाण,युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत,शाखा प्रमुख रामचंद्र पालव,उपशाखा प्रमुख रमेश फणसे,युवासेना शाखा प्रमुख हेमंत पालव,यू.उपशाखा प्रमुख कुणाल पालव,भावेश पालव, माजी मुख्याध्यपक सूर्यकांत पालव,दत्तू नाईक,माजी पोलिस पाटील विकास सावंत,गोपाळ पालव,सुबोध पालव,सदाशिव पालव,ओमकार राणे,सुजित पालव,बाबू रेडकर,राम अर्जुन पालव,भाई माधव,प्रशांत फणसे,रमेश पालव,महेश फणसे,कृष्णकुमार पालव,भावेश पालव,संदीप पालव,बबन नाईक,पंढरीनाथ पालव आदींसह बिळवस ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.