Kokan: इंडियन ऑइलमध्ये 457 जागांसाठी भरती सुरू

0
28
इंडियन ऑइल,
इंडियन ऑइलमध्ये 457 जागांसाठी भरती सुरू

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l 17 फेब्रुवारी

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. इंडियन ऑइलने तांत्रिक आणि नॉन-टेक्निकल ट्रेडमधील अप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक उमेदवार इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कंत्राटी-शिक्षक-भरती-बंद/

रिक्त जागा : 457

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर

2) टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / सिव्हिल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [अनुसूचित जाती/जमाती : 5 वर्षे सूट, ओबीसी : 3 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here