Kokan: इन्सुली – वेत्ये – निगुडे – सोनुर्ली परिसरात सुरू असलेल्या काॅरी क्रशर त्वरीत बंद करण्याची मागणी

0
71
काॅरी क्रशर ,
इन्सुली - वेत्ये - निगुडे - सोनुर्ली परिसरात सुरू असलेल्या काॅरी क्रशर त्वरीत बंद करण्याची मागणी

इन्सुली/सुनीता भाईप- वेत्ये,निगुडे,सोनुर्ली परिसरात सुरू असलेल्या काॅरी, क्रशर त्वरीत बंद करण्यासाठी अजय कोठावळे आणि ग्रामस्थांनी खनिकर्म खाते गोव यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती त्यावर अधीकार्यानी पहाणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-नुकसानग्रस्त-काजू-शेतकर/

खनिकर्म अधीकार्याचा काॅरी मालकाशी साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे इन्सुली – वेत्ये – निगुडे – सोनुर्ली येथे सुरू असलेल्या काॅरी क्रशर त्वरीत बंद करण्यात यावा यासाठी अजय कोठावळे यांनी गोवा खनिकर्म खात्याला लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी कली होती. काॅरी मालक खोलवर बोरीग करून स्पोट करत असल्याने तेथील घरांना तडे जात असल्याने लाखो रूपयाची नूकसानी होत आहे. तसेच काळ्या दगडाच्या धुळीमुळे शेती बागायती नापीक झाली आहे.

गेली १५ वर्ष रात्र दिवस स्फोट करत असल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थ वेळोवेळी काॅरी, क्रशर बंद करण्यासाठी लढा देत आहेत. मात्र खनिकर्म अधीकार्याचे व महसुल अधीकार्याचे धनदांडग्या काॅरी मालकाशी साटे लोटे असल्याने ग्रामस्थाचा आवाज दडपण्यात येत आहे.लोकप्रतिनीधी गप्प का असाही सवाल ग्रामस्थ करत आहेत. अजय कोठावळे आणि ग्रामस्थांनी गोवा मायनिंग खाते व सावंतवाडी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन कायमच्या काॅरी तसेच क्रशर बंद करण्याची मागणी केली असता जिल्हा खनिकर्म अधिकारी वि.भु.साळवे. गोवा खनिकर्म खात्याचे अधीकारी धनंजय कुमार यांनी येवून पहाणी करून काॅरी मालकाना व वरिष्ठ अधीकारी नागपूर यांना अहवाल आदेश देण्याचे तोंडी आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने अजय कोठावळे यांनी काॅरीवर धडक देवून काॅरी बंद पाडू यात कोणताही अनूचीत प्रकार घडल्यास संबंधीत खाते जबाबदार राहील असल्याचा निर्वाणीचा ईशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here