Kokan: एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सपतनाथ मंदिराला मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली

0
82
मंदिर,
Kokan: एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सपतनाथ मंदिराला मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

सरमळे- भाविकांचे अनेक वर्षांपासूनचे एका रात्रीत मंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले असून यातून सरमळेवासियांची एकजूट दिसून आली. पांडवकालीन सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधून पांडवकालीन इतिहासाची पुनरावृत्ती केली असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-लोरे-येथील-कामांचे-भूमिप/

मंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे येथे एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सपतनाथ मंदिराला भेट देत सपतनाथचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी सरमळे सरपंच विजय गावडे, भालावल सरपंच समीर परब, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, सरमळे शाखाप्रमुख संजय गावडे, देवस्थान मानकरी विठ्ठल गावडे दाजी गावडे, नाना गावडे, श्री गावडे, अविनाश गावडे, मंगेश सावंत, राकेश गावडे, विश्वजीत गावडे, सागर गावडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here