वेंगुर्ला प्रतिनिधी-वेताळ प्रतष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी कोणत्याही सामाजिक ज्वलंत विषयावर घेतलेल्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत नेहा ढोले व महिमा नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकविला. https://sindhudurgsamachar.in/kokan-सर्वर-डाऊनमुळे-नुकसान-भर/
ही स्पर्धा शालेय (इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शालेय मुली) आणि खुला अशा दोन गटात घेण्यात आली. स्त्री-भ्रूण हत्या, निर्भया, लग्न समस्या, वानरांचा उच्छाद, सोशल मीडियाच्या अति वापरामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे, जिजाऊ संदेश, विठ्ठलाचे वर्तमान मनोगत, मुलींची वाढती असुरक्षितता, वारकरी, मोबाईलचा अति वापर, आरक्षण अशा अनेक विषयावर महिलांनी साभिनय एकपात्री सादरीकरण केले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे – खुला गट – प्रथम – नेहा ढोले (पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी), द्वितीय- पूर्वा चांदरकर (राणी पार्वतीदेवी सावंतवाडी), तृतीय-रीना मोरजकर (बांदा), उत्तेजनार्थ-सोनाली गोडे (पिगुळी) व विणा गावडे (पेंडूर), शालेय गट – प्रथम-महिमा नार्वेकर (न्यू इं.स्कूल, उभादांडा), द्वितीय-आर्या चेंदवणकर (प्रि.एम.आर.देसाई मिडियम स्कूल, वेंगुर्ला), तृतीय-वीरा पारकर (पवार शाळा, देवगड), उत्तेजनार्थ-श्रावणी आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) व तनिष्का देसाई (डेगवे).
सर्व विजेत्या स्पर्धकांना लवकरच रोख पारितोषिक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.