वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-भेंडमळा येथील रहिवासी छगन गंगाराम नवार (३८) हा युवक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ओहोळामध्ये मयत स्थितीत आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या छगन नवार हा ओहोळात पडलेला निदर्शनास आल्यावर त्याबाबत वेंगुर्ला पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलिस हवालदार भगवान चव्हाण, योगेश सराफदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची खबर आनंद गंगाराम नवार यांनी वेंगुर्ले पोलिस स्थानकात दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-बाबा-दाभोलकर-यांचे-निधन/
याबाबत वेंगुर्ले पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पोलिस हवालदार योगेश सराफदार हे अधिक तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.