Kokan: कणकवलीत काही भागात पाणीटंचाई ; नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

0
80
कणकवलीत काही भागात पाणीटंचाई ; नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी टँकरद्वारे केला पाणीपुरवठा
कणकवलीत काही भागात पाणीटंचाई ; नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

इतर भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी;सत्ताधाऱ्यांचे पाणी समस्येकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

कणकवली – गडनदी पत्रातील पाणीसाठा संपल्याने कणकवली नगरपंचायत मार्फत पुरविले जाणारे पाणी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. मात्र कणकवली शहरातील नाथ पै. नगर, बिजली नगर येथील काही रहिवाशी हे नगरपंचायतच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. याची माहीती मिळताच शिवसेना गटनेते, नगरसेवक सुशांत नाईक यांनी तात्काळ टँकर उपलब्ध करून नाथ पै. नगर व बिजली नगर येथील रहिवाश्यांना पाणी पुरवठा केला. यासाठी नगरसेवक मानसी मुंज व योगेश मुंज यांनी देखील सहकार्य केले. याबद्दल रहिवाश्यांनी सुशांत नाईक, मानसी मुंज यांचे आभार मानले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-शाळांना-15-जून-प/

गेले काही दिवस गडनदी पत्रातील पाणीसाठा कमी होत होता.पाण्याची टंचाई होणार हे माहित असताना देखील कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी यावर कोणतीही उपायोजना केली नाही. कणकवली शहरातील पाणीपुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. शिवडाव धरणातील पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून घेतली असता हे पाणी पोहोचण्यास दोन दिवस लागणार आहेत. शहरातील काही रहिवाशी हे पूर्णता नगरपंचायतच्या पाण्यावर अवलंबून असून .पुढील दोन दिवस त्यांना पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.अशा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कणकवली नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. अद्याप वेळ गेलेली नाही नगरपंचायतच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या रहिवाश्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी शिवसेना गटनेते, नगरसेवक सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here