Kokan: कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर

0
137
शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर
कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर

प्रतिनिधी-पांडुशेठ साटम

कणकवली- कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयभवन येथे पार पडली. नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रामू विखाळे तर खजिनदार पदी प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख संदेश पारकर,आ. वैभव नाईक यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-बँकेला-रिझर्व्ह-बॅ/

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,सचिन सावंत, राजू राणे,भालचंद्र दळवी,महेश कोदे,रुपेश आमडोस्कर,दिव्या साळगावकर,माधवी दळवी,विलास गुडेकर,सचिन आचरेकर,संजय पारकर,रोहित राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here