कणकवली ता.२०-: विजांच्या कडकडाटासह कणकवली तालुक्यात शनिवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे विद्युत पुरवठा ही खंडित झाला आहे. पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-जिल्हा-संघटक-श्र/
शिरगांव येथे सकाळी ९.१५ पासून गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात
तुळस गावात पावसाची हजेरी
कडक उन्हाळा सुरू असताना आज सकाळी पावसाळी सदृश्य वातावरण निर्माण होऊन वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. या दरम्यान, पंचक्रोशीतील वातावरणामध्ये गारठा पसरल्याने नागरिकांमध्ये काहीकाळ समाधानाचे चित्र होते.
दरवर्षी पेक्षा यंदा वातावरणात प्रचंड उष्मा वाढला आहे. घामाच्या धारा ओघळत आहेत. याचा फटका नागरिकांसोबतच रूग्णांनाही बसत आहे. दोन दिवस काही ठिकाणी पाऊस लागल्याची वार्ता होती. दरम्यान, आज शनिवारी वेंगुर्ला तालुक्यात अचानक पावसाळी वातावरण निर्माण झाले. ढग अंधारून आल्याने जोरदार पाऊस पडणार असे वाटत असतानाच आलेल्या वा-याने पाऊस पुढे गेला. तर तुळस गावात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली.