Kokan: कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
48
कणकवली शहरातील समस्यांबाबत निवेदन
Kokan: कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

शहरवासीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांची धडपड

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

कणकवली – कणकवली शहरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेत शहरातील समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यानामध्ये लाईट व्यवस्था करणे, जेसीबीच्या सहाय्याने नाथ पै नगर गणपती साना जाणारा रोड तयार करणे, तसेच नूतन बॅटमिंटन हॉल येथे लाईट व्यवस्था करणे या मागण्या करण्यात आल्या असून मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांनी दिला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-रामगड-देसाईवाडा-जाणाऱ्य/

या निवेदनात म्हटले आहे कि, कणकवली शहरामध्ये एकमेव श्रीधर नाईक उद्यान आहे. त्या उद्यानाचे काम ह्या वर्षी पूर्ण झाले असून, सर्व सामान्यासाठी खुले करण्यात आलेले आहे. दिवसभर उद्याना मध्ये गर्दी असते तसेच सायंकाळी सुद्धा लोंकाची गर्दी असते, परंतु उद्यानामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या जनतेला नाहक त्रास होत आहे. तरी श्रीधर नाईक उद्यान मध्ये लाईट व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी.उद्यानाच्या बाजूला कणकवली नगरपंच्यायतच्या स्वागताचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. सदर बोर्ड मधून वीज पुरवठा उद्यानाला देण्यात यावा जनतेची होणारी गैरसोय पाहता येत्या आठ दिवसात लाईट व्यवस्था करण्यात यावी.त्याचबरोबर जेसीबीच्या साहाय्याने नाथ पै नगर गणपती साना जाणारा रोड तयार करण्यात यावा. नूतन बॅटमिंटन हॉल येथे लाईट व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या ८ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here