Kokan: कणकवली शहरात युवकाचा आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

0
35
Murder
कणकवली शहरात युवकाचा आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवली:-

शहरातील महापुरुष काॅम्प्लेक्सच्या पाठीमागील साईडला इमारतीला टेकून बसलेल्यास्थितीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिक्षक-संघ-दापोलीने-केला/

त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, सागर शेगडे, पांडुरंग पांढरे, भूषण सुतार दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनाकडून मृतदेहाची आेळख पटविण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी त्या युवकाचा मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here