दापोली- दापोली तालुक्यातील कर्दे येथील श्री ब्रह्मा विष्णू महेश कला व क्रीडा मंडळाने शिवजयंतीनिमित्त गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते. लहान व मोठ्या शालेय गटांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला. https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-गजानन-महाराज-प्रकटद/
दापोली तालुक्यातील कर्दे येथील श्री ब्रह्मा विष्णू महेश कला क्रीडा संस्था कर्दे गावात शालेय विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना संधी देण्यासाठी दरवर्षी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने कबड्डी व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी शिवजयंतीदिवशी आयोजित केलेल्या या स्पर्धेस अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला.
रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात – गार्गी रहाटवळ हिने प्रथम, सई कोंडकर हिने द्वितीय तर निहारीका नागवेकर, मारीया घनसार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात – श्रेयश खांबे, ऋषभ खांबे, प्रेम खांबे, विरेन रहाटवळ यांनी प्रथम, सोनाक्षी भुवड हिने द्वितीय तर मुक्ताई माने हिने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे परिक्षण प्रथितयश साहित्यिक तथा कलावंत बाबू घाडीगांवकर व नेहा जोशी यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने आकर्षक ट्राॅफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेतेपद पटकावलेल्या सर्व स्पर्धकांचे मंडळाचे अध्यक्ष राहुल नागवेकर, सचिव दिनैश रुके यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.