🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
श्याम बेनेगल व सिंधुदुर्गतील समुद्र किनारपट्टीवर वसलेल सुंदरगाव कोंडूरा गावाशी असलेल नात…तूम्ही म्हणाल कस शक्य आहे..चला जाणून घेऊया..
चित्रपट मंथन (स्मिता पाटील) ते कलयुग (शशी कपूर) ते जुबेदा (करिष्मा कपूर) असे एकसेएक नितांत सुंदर चित्रपट देणारे कलादिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या संघर्षाच्या काळात सिंधुदुर्गातील या गावाने त्यांच्या करिअरला उभारणी दिली होती . मालवण आणि वेंगुर्ल्यामध्ये “कोंडुरा”नावाचे एक निसर्गरम्य गाव किनारपट्टीवर लपलेले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्हा-वारकरी-संप्रदाया/
वेंगुल्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक त्र्यं. ची खांनोलकर उर्फ आरती प्रभू यांनी “कोंडुरा” नावाची एक नितांत सुंदर कादंबरी लिहिली होती. वेंगुर्ल्याच्या या कादंबरीवर श्याम बेनेगल यांनी “कोंडुरा” नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्याकाळी म्हणजे १९७८साली तो खुप गाजला होता. एक अर्थाने शाम बैनेगल यांच्या संघर्षाच्या काळात सिंधुदुर्गातील या गावाने त्यांच्या करिअरला उभारणी दिली होती
टिप- पंडित जवाहरलाल नेहरू यांची सख्खी बहिण विजयालक्ष्मी पंडित यांचे सासर कोंडुरा असल्याचे म्हटले जाते अधिक माहीती कोणाकडे असल्यास कळवावे..