वेंगुर्ला प्रतिनिधी- भारताचे भूतपूर्व पंतप्रधान, कवी मनाचे व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला, आनंदयात्री वाङ्मय मंडळ व बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने परबवाडा -कणकेवाडी येथे कवी संमेलन घेण्यात आले. अटलजींच्या प्रतिमेस प्राचार्य एम.बी.चौगले व सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-साहित्य-व-सांस्कृतिक-संघ/
प्रा.सुरेखा देशपांडे, प्रा.सुनिता जाधव, प्रा.नंदगिरीकर, डॉ.पूजा कर्पे, शिक्षिका प्राजक्ता आपटे, श्रेया मयेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, अजित राऊळ, कैवल्य पवार, प्रा.महेश बोवलेकर, अॅड.चैतन्य दळवी, डॉ.आनंद बांदेकर, फाल्गुनी नार्वेकर, शैलेश जामदार, प्रिती वाडकर, मयुरी राऊळ, दिव्या गावडे, दिया वायंगणकर, दिव्या मांजरेकर आदींच्या कविता वाचनाने अटलजींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रसन्ना देसाई, उपसरपंच पपू परब, प्रा.चुकेवाड, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, प्रकाश रेगे, हेमंत गावडे, संतोष गावडे, स्वरा देसाई, सुधीर गावडे, डॉ.सचिन परूळकर, महेश राऊळ, मारूती दोडशानट्टी आदी उपस्थित होते.
फोटोओळी – अटलजींच्या प्रतिमेस प्राचार्य एम.बी.चौगले व सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.