🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-
वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. ग्रामीण व शहरी भागातील संघटना मजबूत करण्यासंदर्भात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बूथ व वॉर्ड कमिट्या सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/kokan-अणसूर-गावात-३२-लाखांच्या/
यावेळी माजी नगरसेवक आत्माराम सोकटे, प्रकाश डिचोलकर, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे, युवक तालुकाध्यक्ष प्रथमेश परब, तालुका उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर, अमोल राऊळ, आत्माराम घाडी, अंकुश मलबारी, गंगाधर कोचरेकर, उमेश मोंडकर, प्रशांत परब, जगन्नाथ गावडे, विशाल गावडे, निलेश मयेकर, अभिजीत राणे, अॅड.अनुराधा वेर्णेकर इत्यादी उपस्थित होते.
फोटोओळी – काँग्रेसच्या बैठकीवेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.