Kokan: काळेथर बेकायदेशीर उत्खनन करण्यात प्रशासनाची मिलीजुली ? फौजदारी दाखल करा ग्रामस्थांची मागणी.

0
89
जागृत आडेली ग्रामस्थांनी उधळून लावला काळेथर दगड चोरीचा कट !
काळेथर बेकायदेशीर उत्खनन करण्यात प्रशासनाची मिलीजुली ? फौजदारी दाखल करा ग्रामस्थांची मागणी. जागृत आडेली ग्रामस्थांनी उधळून लावला काळेथर दगड चोरीचा कट !

बेकायदा काळेथर उत्खननात महसुलकडून पंचनाम्यानंतरही प्रशासनाची साहीत्य जप्त करण्यास टाळाटाळ ? ⭐प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे साहित्य पळवून नेण्याचा संबंधीताचा दोनवेळा प्रयत्न एकाच नंबरच्या दोन जेसीबी एक अनेधीकृत वापरात असणारा जेसीबी गायब प्रकरणाची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेंगुर्ले : आडेली-कामळेवीर येथे सर्व्हे नंबर ११/४ या जागेत बेकायदेशीर काळ्या दगडाचे उत्खनन करून तो चोरून नेण्याचा कट तेथील नागरिकांनी उधळून लावला होता तसेच स्पोटक वापरून तेथील परिसर दणाणून निघाले असते आणि यात तेथील परिसरातील विहीरी अथवा कमकुवत घराना धोका निर्माण होउ शकत होता. त्यामुळे संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांचे साहित्य जप्त करा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान या ठिकाणी उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी असलेले डंपर व जेसीबी जागेवरच असल्यांने ते प्रशासनाने अजूनही सिल केलेले नाहीत त्यामुळे ते पळविण्याचा प्रयत्न दोन वेळा करण्यात आला. याबाबत लक्ष वेधून सुध्दा कोणीच दखल घेत नाही. त्यामुळे यात प्रशासनाची मिलीजुली भगत आहे की काय? असा सवाल तेथील ग्रामस्थ जीवन कुडाळकर व ग्रामस्थ यांनी केला आहे . https://sindhudurgsamachar.in/kokan-महिला-उत्कर्ष-समितीच्या/

काही महिन्यांपुर्वी एकाच नंबरचे दोन जेसीबी असल्याचे प्रकरण आडेली ग्रामस्थांनी उघडकीस आणले होते. तरी या खाकीवर्दीने कारवाईच्या नावाखाली मलीदा गिळून गप्प झाले. तो जेसीबी परस्पर पळवून नेण्यात आला होता. असेच प्रकार याही प्रकरणात घडू शकत नाही अशी शक्यता नाकारता येत नाही. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

यात त्या ठिकाणची वन म्हणून नोंद असलेल्या जमिनीत बिनधिक्कत उत्खनन केले जात आहे. याबाबतची तक्रार करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी वन व महसुलकडून पंचनामा करण्यात आला. मात्र त्यानंतर पुढे काहीच झालेले नाही. जप्त करण्यात आलेले साहित्य त्याच ठिकाणी पडून आहे ते प्रशासनाकडुन जप्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधिताकडून ते दोन वेळा पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रशासन याबाबत चिडीचूप आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here