⭐ अभियंत्याच्या निदर्शनास आणूनही डोळेझाक केल्याने पहिल्याच पावसात झाली दुरावस्था. ⭐ कास सरपंचाना शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी ⭐ ठेकेदाराचे बिल अदा करू नये व संबधीत अभियंत्यांवर कारवाई करून निलबंनाची ग्रामस्थांची मागणी. ⭐ अन्यथा १५ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा कास सरपंच ग्रामस्थांचा इशारा.
सुनिता भाईप/ सावंतवाडी- कास- शेर्ले या सात किलोमीटर रस्त्याचे काम निक्रुष्ठ होत असल्याने वेळोवेळी सरपंच तसेच ग्रामस्थानी ठेकेदाराच्या निदर्शनास आणूनही मनमानी कारभार करत असल्याने संबधीत अभियंत्याच्या निदर्शनास आणले असताना त्या अभियंत्याचे ठेकेदाराशी साटेलोटे असल्याने डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.कास सरपंच काम निक्रुष्ठ होत असल्याने कार्यालयामध्ये गेले असता सदर अभियंत्याने कास सरपंचाना शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकिही दिली होती. https://sindhudurgsamachar.in/kokan-३१-जुलैपर्यंत-रायगड-किल्/
पहिल्याच पावसात बोगस कामाचा पर्दा फाश झाला आहे.ठिकठिकाणी रस्ता वाहुन गेला आहे.शेर्ले येथील मोरी कोसळल्याने ऐन गणेश चतुर्थीला रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.याठीकाणी अपघात होऊन जिवित हानी होण्याची शक्यता आहे.सदर अभियंत्याने घटनास्थळी येऊन सरपंच तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थाना घेऊन पहाणी करून त्वरीत परत कामाला सुरूवात करण्याची मागणी करत आहेत अन्यथा 15 ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.