Kokan: कुंभवडे येथील युवा प्रतिष्ठानच्या आरोग्य तपासणी शिबिराचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

0
19
युवा प्रतिष्ठान,आरोग्य तपासणी शिबिर, मा. आम. वैभव नाईक
युवा प्रतिष्ठानच्या आरोग्य तपासणी शिबिराचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

बी.के.एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण आणि जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांचे सहकार्य

कुंभवडे युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे वैभव नाईक यांनी केले कौतुक

युवा प्रतिष्ठान कुंभवडे यांच्या वतीने व बी. के. एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण, ता.चिपळूण व  जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालय येथे  गावातील ग्रामस्थांसाठी  मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. तज्ञ  वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नागरिकांची रक्तदाब, रक्त तपासणी, शुगर तपासणी, इसीजी आणि इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आणि आवश्यक औषधांची शिफारस केली. शिबिराला स्थानिक ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला यावेळी १५० हून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख  सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुका संपर्कप्रमुख  तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोस्कर , कुंभवडे शाखाप्रमुख प्रकाश बिले, कुंभवडे सरपंच सौ. विजया कानडे, माजी सरपंच आप्पा तावडे, समाजसेवक पी.एम. सावंत,शरद सावंत, काशीराम सावंत, आकाश तावडे, सुनील सावंत आदींसह शाळेच्या मुख्याधापक, शिक्षक व  ग्रामस्थ उपस्थित होते. 

       यावेळी  वैभव नाईक म्हणाले,धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. हि गरज ओळखून  युवा प्रतिष्ठानने स्वतः पुढाकार घेऊन कुंभवडे सारख्या छोट्याशा गावात तज्ञ  वैद्यकीय अधिकारी  निमंत्रित करून  आरोग्य शिबीर आयोजित केले हि कौतुकास्पद बाब आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाने सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि आरोग्य तपासणी शिबिरास शुभेच्छा दिल्या. 

      यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक यांनी देखील आपल्या भाषणात आरोग्य सेवांचा महत्त्व आणि मोफत आरोग्य शिबिराच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. अशा प्रकारच्या शिबिरांमुळे स्थानिक नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि नियमित तपासण्या करण्याची प्रेरणा मिळते. हे शिबिर नागरिकांच्या आरोग्यवाढीसाठी एक मोलाची पायरी आहे. युवा प्रतिष्ठानने अत्यंत मेहनतीने आणि समर्पणाने या शिबिराचे आयोजन केले. त्यांचा पुढाकार आणि सक्षमता यामुळे शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे सांगत युवा प्रतिष्ठानचे कौतुक केले. शिबिराचे आयोजन अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने केल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. आयोजकांनी  सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here