प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
कुडाळ – आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील वरची कुंभारवाडी वॉर्ड क्र. १६ मध्ये गणेश घाटासाठी ५ लाख रुपये मंजूर केले आहेत. आणि त्याचबरोबर वरची कुंभारवाडी येथे नवीन बोरवेल मंजूर करून दिली आहे.या दोन्ही कामांची भूमिपूजने बुधवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कामांसाठी कुडाळचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच गणेश घाटासाठी आरएसएन हॉटेलचे मालक राजन नाईक यांचेही योगदान लाभले. https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रामपंचायत-कार्यालय-घो/
याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगरसेवक सचिन काळप, नगरसेविका श्रेया गवंडे व श्रुती वर्दम, आरएसएन हॉटेलचे मालक राजन नाईक,कृष्णा तेली, बबन कुंभार, गोपाळ कुंभार, सुनील कुंभार, महेश कुंभार, किरण कुंभार, अंकुश शिरोडकर, महेश कुंभार, संतोष कुंभार, प्रल्हाद म्हाडदळकर, अनिल कुंभार, संदिप कुंभार, प्रकाश कुंभार, अनंत कुंभार, रोहिदास पावसकर, बाबू कुंभार, साई कुंभार, लक्ष्मण कुंभार, गणपत कुंभार यांसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.