🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l परुळे l संदीप चव्हाण-
परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भूपेश घराजवळ असलेल्या ओहोळ च्या पाण्यात घरातील मोठ्या व्यक्तींची नजर चुकवून गेला. बुडाल्याने भूपेश दुर्दैवी निधन झाले.
सकाळी 9.45 च्या दरम्यान तो घरच्यांची नजर चुकवून ओहोळ च्या दिशेने गेला आणि पाण्यात बुडाला याची कोणालाच कल्पना नव्हती घरात दिसून आला नाही म्हणुन मग आसपासच्या घरांमधे शोध घेतला गेला मात्र तो दिसून आला नाही. नंतर परिसरात शोध घेतला असता तो पाण्यात तरंगताना दिसून आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-हिंदू-धर्म-रक्षक-दानशूर-म/
तातडीने त्याला परूळे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनंतर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो वाचू शकला नाही .या दुर्दैवी घटना घडली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना शाखा प्रमुख परुळे निलेश परुळेकर यांचा तो मुलगा होता.